लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Monday 4 April 2016

भरण कालव्याचे ठिकाण बदलले तरच वेजेगाव तलाव पूर्ण भरू शकेल

टेंभू योेजनेची कामे गतीने -
 (विजय लाळे यांच्या ब्लॉग वर पहा टेंभू चे अपडेट्स ) ….
टेंभूच्या खानापूर - तासगाव कालव्याच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले तर पारे भागापर्यंत पाणी पोहोचेल. तसेच 4 थ्या टप्प्याच्या निविदा निघाल्या आहेत. लवकरच पंपगृहाच्या कामाला सुरूवात होईल. एकूणच खानापूर तालुक्यात टेंभू योेजनेची कामे गतीने सुरू आहेत.
खानापूर तालुक्यात सरत्या आठवड्याच्या सुरुवातीला करंज ओढ्यात पाणी सोडल्याने गार्डी, घानवड आणि हिंगणगादे गावांच्या परिसरापर्यंत पाणी पोहोचले आहे. माहुली पंपगृहातून तिसर्‍या ब टप्प्यातून हे पाणी खानापूर ते तासगाव कालव्यात सोडले होते. त्यातून भाग्यनगर तलावातही पाणी सोडण्यात आले. परंतु हा कालवा एकूण 41 किलोमीटर अंतराचा आहे. माहुली ते पारे गावच्या शिवेपयर्ंत हा कालवा आहे.
या अंतरातल्या विट्या जवळच्या बोगद्याचे काम अपूर्ण आहे. विटा - साळशिंगे रस्त्यावरील आयटीआय च्या टेकापलिकडून हा बोगदा सुरू होतो ते थेट शिवमल्हार हिल्स म्हणजे, सुळकाईच्या डोंगराच्या पायथ्याच्या कदम वस्तीपयर्र्ंत. एकूण उत्‍तर-दक्षिण असलेल्या या बोगद्याचे एकूण अंतर सव्वा दोन किलो मीटर अर्थात 2 हजार 270 मीटर इतके आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूंकडून गेल्या 6 वर्षांपासून कामे सुरू आहेत.
गेल्या दीड वर्षात गती घेतल्यांनतर आता आजअखेर एकूण 355 मीटरचे काम अपूर्ण आहे. हे काम 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन आमदार अनिलराव बाबर यांनी दिले आहे. यातल्या उत्‍तरेकडचे काम बर्‍यापैकी पूर्ण झाले आहे. परंतु दक्षिणेकडून आतल्या भागाचे काम सध्या दिवसामागे 2 ते 3 मीटर इतकेच होत आहे.
दक्षिणेकडून बोडरे वस्तीच्या अलिकडच्या भागातून जॅक सपकाळ यांच्या शेताजवळून हा बोगदा सुरू होतो. जवळपास 1 हजार 100 मीटर पर्यंतच्या पुढे आत काम झालेले आहे. आत पाणी आणि हवा पोहोचण्यासाठी स्वतंत्र पाईप्स टाकल्या असल्या तरी अत्यंत कोंदट, उष्ण असे वातावरण आहे. काही ठिकाणाहून पाण्याचे पाझर सुरू आहेत. त्यातच एकदा तीन ते चार जिलेटीनचे स्फोट घेतल्यानंतर आतला धूळ आणि तयार झालेला वायू बाहेर जाण्यासाठी (म्हणजेच मकींगसाठी) किमान 5 ते 6 तास लागत आहेत. त्यांनतर आतले उडालेले दगड, कपर्‍या बाहेर काढण्यात येतात.
वेजेगाव पंपगृह, टप्पा क्रमांक 4 च्या पंपगृहाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच वर्क ऑर्डर निघून कामे सुरू होतील. सुरुवातीला वेजेगाव तलाव भरून घेण्याचे नियोजन आहे, असे आमदार बाबर यांनी सांगितले आहे परंतु ज्या माहुली ते घाणंद मुख्य कालव्याला टप्पा क्रमांक 4 चा भरण कालवा जोडायचा आहे, त्या ठिकाणी मुख्य कालवा खाली आणि वेजेगाव तलाव वर अशी स्थिती आहे. त्यामुळे भरण कालव्याचे ठिकाण बदलले तरच वेजेगाव तलाव पूर्ण भरू शकेल, अन्यथा सध्याच्या नियोजनाप्रमाणे वेजेगाव तलावाच्या आग्‍नेय दिशेला असणार्‍या वरच्या बाजूकडील पंपगृहाकडे पाणी पोहोचू शकेल.